लातूर शहरातून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:00+5:302021-01-10T04:15:00+5:30
चाकूर येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण लातूर : चाकूर येथे पाचदिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर ...
चाकूर येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण
लातूर : चाकूर येथे पाचदिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर रोड येथे १८ जानेवारीपर्यंत प्रशिक्षण होणार असून, नाव नाेंदणीसाठी दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकरी व मधुमक्षिका पालन करणाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
माळेगाव खुर्द येथे अभिवादन कार्यक्रम
लातूर : अहमदपूर तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शोभाताई देशपांडे, राजश्री देशपांडे, अश्विनी देशपांडे, सविता नखाते, ज्योती शेळके, कोमल शेळके, कविता बनसोडे, मनीषा जुबरे, सागरबाई कसबे, गंगाधर आरदवाड, गोपाळ कसबे, नरसिंग कानगुले, गंगाधर कानगुले, गोपाळ मोरपले, महादेव कसबे, विष्णुकांत शेळके, देविदास बनसोडे, आदी उपस्थित होते.
निलंगा येथून दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल
लातूर : निलंगा येथील एका फार्म हाऊसवर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी करण राजकुमार नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून निलंगा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
जिल्हाध्यक्षपदी अभिजित मुद्दे
लातूर : इन्साफ सेना लातूर जिल्हाध्यक्षपदी अभिजित मुद्दे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष दिलीप ठोके यांनी निवड केली. या निवडीबद्दल ॲड. आशिष पंचाक्षरी, शरद कापसे, विकी वाघचाैरे, शुभम पाटील यांनी काैतुक केले.