लातूर शहरातून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:56+5:302021-05-17T04:17:56+5:30
संगनमत करून एकास मारहाण लातूर : तू येथे का आलास, तू इंदिरा नगर येथून मारहाण करायला आलास का, असे ...
संगनमत करून एकास मारहाण
लातूर : तू येथे का आलास, तू इंदिरा नगर येथून मारहाण करायला आलास का, असे म्हणून शिवीगाळ करत मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केल्याची घटना अंजली नगर येथे घडली. या प्रकरणी फिर्यादी सुमित गौतम टेकाळे यांच्या तक्रारीवरून असिफ शेख व सोबत असलेल्या दोघा जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत. दरम्यान, फिर्यादीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
गाडी लावण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : घरासमोर गाडी लावल्याने आमच्या घरासमोर गाडी लावू नको असे म्हणून संगनमत करून शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्याने मारहाण केल्याची घटना लातूर शहरातील इस्लामपुरा येथे घडली. या प्रकरणी पाशामियाँ महेबुबसाब शेख यांच्या तक्रारीवरून अमजद अजमल तांबोळी व सोबत असलेल्या दोघा जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादीच्या तोंडावर बुक्की मारून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास पोहेकॉ. कोकणे करीत आहेत.
रक्तदान शिबिरात १५१ जणांचा सहभाग
लातूर : लातूर येथे राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाअंतर्गत रक्तदान हेच जीवनदान ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. सदरील शिबीर लातूर, उस्मानाबाद, पुणे या तीन ठिकाणी घेण्यात आले. यामध्ये १५१ जणांनी रक्तदान केले. यशस्वितेसाठी बालाजी जाधव, विशाल देवकाते, विवेक शिंदे, राजाभाऊ चौगुले, दीपक लांडगे, समाधान कडूकर आदींनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.