या भागात चोरी होते, अंगठी काढून ठेवायला लावत दाेघा ताेतया पाेलिसांनी वृद्धास लुबाडले

By राजकुमार जोंधळे | Published: August 23, 2022 07:56 PM2022-08-23T19:56:44+5:302022-08-23T19:57:56+5:30

बाेटातील अंगठी काढून एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून खिशात ठेवण्यास सांगितले

Thefts are common in this area, two fraud policemen robbed an old man | या भागात चोरी होते, अंगठी काढून ठेवायला लावत दाेघा ताेतया पाेलिसांनी वृद्धास लुबाडले

या भागात चोरी होते, अंगठी काढून ठेवायला लावत दाेघा ताेतया पाेलिसांनी वृद्धास लुबाडले

Next

लातूर : दाेघा ताेतया पाेलिसांनी एका वृद्धाला आम्ही पाेलीस आहाेत, अशी बतावणी करुन लुबाडल्याची घटना एमआयडीसी परिसरात भरदिवसा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी त्यांनी वृद्धाची अंगठी पळवली असून, याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नामदेव लालासाहेब जाधव (वय ७६ रा. कानडी बाेरगाव जि. लातूर) हे आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी वरवंटी तांड्याकडे निघाले हाेते. दरम्यान, साेमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका ऑईल मिलनजीक दाेघांनी त्यांना अडविले. आम्ही पाेलीस आहाेत, बाेटातील अंगठी काढून ठेवा, कालच या भागात चाेरी झाली आहे असे सांगितले. यावेळी बाेटातील अंगठी काढून एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून तुमच्या खिशात ठेवा, म्हणून कागदाची पुडी त्या व्यक्तीच्या खिशात ठेवली. दरम्यान, थाेड्या वेळाने फिर्यादी जाधव यांनी खिशात ठेवलेली कागदाची पुडी उघडून पाहिली असता, तयात त्यांची १० ग्रॅम वजनाची साेन्याची अंगठी आढळून आली नाही. त्याऐवजी एका धातूची अंगठी कागदात आढळून आली. आपली त्या दाेघांनी फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना घामच फुटला. ते ज्या ठिकाणी घटना घडली, त्या घटनास्थळाकडे गेले मात्र, ते दाेघे अज्ञात ताेतया पाेलीस फरार झाले हाेते. दिशाभूल करत अज्ञातांनी फसवणूक केल्याचे समाेर आले.

याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात त्यांनी तातडीने धाव घेत घडलेला प्रकार पाेलिसांसमाेर कथन केला. त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन दाेघा ताेतया पाेलिसाविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलीस हवालदार बिराजदार करत आहेत.

Web Title: Thefts are common in this area, two fraud policemen robbed an old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.