ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी सकारात्मक विचार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:37 AM2021-02-21T04:37:36+5:302021-02-21T04:37:36+5:30
उजनीचे पाणी लातूरला आणणार... उजनीचे पाणी धनेगावमार्गे लातूर शहराला आणले जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्यावर मार्ग ...
उजनीचे पाणी लातूरला आणणार...
उजनीचे पाणी धनेगावमार्गे लातूर शहराला आणले जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लातूर जिल्हा नियोजन समितीला २७५ कोटींचा भरीव निधी मंजूर करून घेतला. या निधीतून विकासकामे गतीने मार्गी लागणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले.
मराठवाड्यात सर्वाधिक दर देणार : माजी मंत्री दिलीपराव देशमुख
मांजरा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख म्हणाले, मांजरा परिवाराने विश्वासाचा व स्नेहाचा वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. या परिवारातील सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मांजरा परिवाराकडून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे कसे अधिक मिळतील, याचा विचार नेहमीच केला जातो. शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात सर्वाधिक दर देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कॅप्शन : मांजरा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख. समवेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, कारखान्याचे व्हाइस चेअरमन श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे व कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते.