विश्वासघात झाला, लातुरात कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By राजकुमार जोंधळे | Published: March 21, 2023 06:05 PM2023-03-21T18:05:03+5:302023-03-21T18:06:18+5:30

संप मागे घेण्याच्या काटकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

There was a betrayal, a symbolic funeral of Vishwas Katkar, convener of the employee Coordinating Committee in Latur | विश्वासघात झाला, लातुरात कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

विश्वासघात झाला, लातुरात कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

googlenewsNext

लातूर : सोमवारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी लातूर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संपकरी कर्मचाऱ्यांनी काटकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत प्रतिमेचे दहन केले. यावेळी काटकरांच्या निषेधार्थ आंदाेलक कर्मचारी, शिक्षकांनी जाेरदार घोषणाबाजी केली.

काटकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लातूर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी संपातील सहभागी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी निषेध आंदाेलन करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा निमंत्रक एस. बी. कलशेट्टी म्हणाले, राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनीच आमचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे हा संप आम्हाला मागे मागे घ्यावा लागत आहे. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी शासकीय निम शासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे बी.बी. गायकवाड, माधव पांचाळ, अनंत सूर्यवंशी, शरद हुडगे, अरविंद पुलगुरले, अशाेक मळगे, गाेविंद गंगणे, हणमंत नागिमे, बालाजी फड, दीपक येवले, एस.डी. महामुनी, व्ही. एन. परभणकर, मदन धुमाळ, नितीन बनसाेडे, गंगाधर एनाडले, महेश हिप्परगे, संजीव लहाने, धनंजय उजनकर, मधुकर जाेंधळे, सुदेश परदेशी, धनंजय चामे, बालकराम शिंदे, अशाेक केनीकर, मंगेश पाटील, राहुल तुंगे, दत्तात्रय सूर्यवंशी, प्रकाश देशमुख, प्रथमेश वैद्य, संताेष माने, बी. जे. पाेतदार, हणमंत मुरुडकर, विठ्ठल बडे, उमेश सांगळे, कृष्णा काेकणे, संजय जाधव, जी. व्ही. माने, जी. जी. राताेळे, जी. एस. माेहाळकर, आर. डी. जटाळ, तानाजी साेमवंशी, रेणुका गिरी, वाजीद सय्यद, अमाेल चामे आदींची उपस्थिती हाेती, असे जिल्हा निमंत्रक एस. बी. कलशेट्टी यांनी सांगितले.

Web Title: There was a betrayal, a symbolic funeral of Vishwas Katkar, convener of the employee Coordinating Committee in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.