'बसमध्ये जागाच नाही'; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

By संदीप शिंदे | Published: August 19, 2023 11:35 AM2023-08-19T11:35:59+5:302023-08-19T11:36:31+5:30

निलंगा आगाराकडून पर्यायी बसची सोय

'There's no space on the bus'; ST bus blocked by students at Rathoda | 'बसमध्ये जागाच नाही'; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

'बसमध्ये जागाच नाही'; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

googlenewsNext

केळगाव : निलंगा तालुक्यातील राठोडा येथे एसटी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, शनिवारी सकाळी गावात बस आली मात्र, त्यात पाय ठेवायलाही जागा नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बस अडविली. त्यामुळे निलंगा आगाराने पर्यायी बस उपलब्ध करुन देत विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी पोहचविले. त्यातही तासभर उशिर झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी उशिर झाला.

राठोडा येथे मागील महिन्यात पावसामुळे रस्ता नसल्याने महिनाभर बस आली नाही. आता बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी उशिर होत आहे. त्यामुळे बसेस वेळेवर सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले. तेव्हा त्यांना बस वेळेवर येईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र, शनिवारी बस गावात आली परंतू त्यात मोठ्या संख्येने प्रवासी होते. विशेष म्हणजे पाय ठेवायलाही जागा नव्हती. परिणामी, विद्यार्थ्यांनी बसच अडविली. अखेर निलंगा आगाराने पर्यायी बस उपलब्ध करुन दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांना एसटी बसमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, राठाेड्यासाठी केळगावमार्गे निलंगा स्वतंत्र बस सुरु करावी, अशी मागणी पालक दयानंद मुगळे, तानाजी सोमवंशी, जिलानी शेख, चक्रधर जाधव, ग्रामपंचायत सदस्य ताजोद्दीन शेख यांनी केली आहे. 

जादा गाडीचे नियोजन करु...
सध्या स्टाफ कमी आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन जादा बस सोडण्याचा निणर्य लवकरच घेऊ असे, निलंगा आगारप्रमुख बिडवे यांनी सांगितले.

Web Title: 'There's no space on the bus'; ST bus blocked by students at Rathoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.