भर दिवसा घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज पळविला
By हरी मोकाशे | Published: March 27, 2023 07:16 PM2023-03-27T19:16:15+5:302023-03-27T19:16:56+5:30
घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी डाव साधला
शिरूर अनंतपाळ : दुपारच्यावेळी घरी कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी शिरूर अनंतपाळात एक घर फोडून सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३१ हजारांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शिरूर अनंतपाळातील श्रीकृष्ण नगरातील मन्मथ शंकराप्पा सुगावे यांच्या घरी रविवारी दुपारी कोणीही नव्हते. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी घराची कडी- कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे गंठण, नेकलेस, नथ असे चार तोळ्यांचे दागिणे तसेच चांदीच्या काही वस्तू आणि रोख ५६ हजार ५०० रूपये असा ३ लाख ३१ हजार ३०० रूपयांचा ऐवज पळविला.
काही वेळानंतर मन्मथ सुगावे हे घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सुगावे यांच्या फिर्यादीवरुन शिरूर अनंतपाळ पोलिसांत रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बशीरसाब जिलानी मानुल्ला हे करीत आहेत.