चोरट्यानी बार फोडून चार लाखाची दारु पळविली; एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

By राजकुमार जोंधळे | Published: September 16, 2022 05:49 PM2022-09-16T17:49:15+5:302022-09-16T17:49:47+5:30

चाकूर आणि हडोळती येथील बार चोरट्यानी एकाच रात्री फोडले आहे.

Thieves broke the bar and stole liquor worth four lakhs; Two burglaries in one night | चोरट्यानी बार फोडून चार लाखाची दारु पळविली; एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

चोरट्यानी बार फोडून चार लाखाची दारु पळविली; एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील चाकूर आणि हडोळती (ता.अहमदपूर) येथे चोरट्यानी बियर बार फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. बारमधील विविध कंपन्यांची जवळपास चार लाखाची दारु पळवली आहे. याबाबत चाकूर आणि अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, चाकूर शहरातील लातूर रोडवर असलेल्या आकाश बारचे समोरील शटरचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. दरम्यान, बारमध्ये ठेवण्यात आलेल्या विविध कंपन्यांचे दारुचे बॉक्स असा २ लाख ५ हजार १४१ रुपयांचा मुद्देमाल पळविला. तर दुसरी घटना याच रात्री अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे घडली. येथील मधुबन बियर बारचे समोरील शटरचे कुलूप तोडून, चोरट्यांनी बारमध्ये प्रवेश केला. बारमध्ये असलेल्या विविध कंपन्याचे जवळपास १ लाख ९६ हजार ८१० रुपयांच्या दारुचे बॉक्स चोरट्याने लंपास केले. दोन्ही घटनेत एकूण ४ लाख १ हजार ९५१ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी...
चाकूर आणि हडोळती येथील बार चोरट्यानी एकाच रात्री फोडले आहे. या चोरीतील 'मोडस' एकसारखी असल्याचे दिसून येत आहे. दोन ठिकाणी चोरी करणाऱ्या चोरट्याची टोळी एकच असावी, असा संशय बळावला आहे.

Web Title: Thieves broke the bar and stole liquor worth four lakhs; Two burglaries in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.