गाेदाम फाेडून चोरट्यांनी तुरीचे २६ कट्टे केले लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: December 27, 2022 07:04 PM2022-12-27T19:04:00+5:302022-12-27T19:05:11+5:30
लातूर एमआयडीसी परिसरातील घटना
लातूर : गाेदाम फाेडून अज्ञात चाेरट्यांनी तुरीचे २६ कट्टे पळविल्याची घटना लातूर ते चिंचाेलीराव वाडी मार्गावर एमआयडीसी परिसरात २५ ते २६ डिसेंबर राेजी घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी अंकुश बालाजी राठाेड (वय ३३, रा. राजे शिवाजीनगर, लातूर) यांचे लातूर ते चिंचाेलीराव वाडी मार्गावर एमआयडीसी परिसरात गाेदाम आहे. अज्ञात चाेरट्यांनी या गाेदामाचे कुलूप कशाने तरी काढून शटर उघडून आत प्रवेश केला. दरम्यान, गाेदामामध्ये ठेवण्यात आलेले तुरीचे ५० किलाेंचे एकूण २६ कट्टे असा १ लाख १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. ही घटना रविवारी घडली.
घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक डाके करत आहेत.