कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, म्हणून सर्वांनी दक्ष राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:42+5:302021-07-04T04:14:42+5:30
उदगीर बाजार समितीमार्फत १० लाख रुपये किमतीचे सी पॅप व व्हेंटिलेटर लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ...
उदगीर बाजार समितीमार्फत १० लाख रुपये किमतीचे सी पॅप व व्हेंटिलेटर लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे, कल्याण पाटील, सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, मंजूरखाँ पठाण, प्रीती भोसले, उषा कांबळे, विजय निटुरे, शेख समीर, ज्ञानेश्वर पाटील, सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.दत्तात्रय पवार, डॉ.शशिकांत देशपांडे, डॉ.सतीश हरिदास आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी केले. आभार प्रा.धनाजी जाधव यांनी मानले. यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक, मार्केट यार्डातील व्यापारी, काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बरीच जीवितहानी झाली. त्यामुळे मागील अनुभवातून तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना तिसरी लाट येणार नाही, याबाबत प्रशासन व जनतेने सतर्क राहून समन्वयाने काम करावे. बाजार समितीने दिलेली ही उपकरणे भविष्यात सामान्य नागरिकांसाठी फारच उपयोगी ठरणार आहेत. त्यामुळे बाजार समितीचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
आगामी काळात मतदारसंघातील विकासाबाबत कुणीही राजकारण करू नये, सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच पालिका निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून एकत्र निवडणुका लढविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.