'ही तर खोकेवीरांची वर्षपूर्ती'; शिंदे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By हणमंत गायकवाड | Published: June 20, 2023 08:13 PM2023-06-20T20:13:22+5:302023-06-20T20:13:42+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनात्मक गद्दार दिवस साजरा करण्यात आला.

'This is the birthday of the 50 khoke ekdum okay'; NCP movement against Shinde government | 'ही तर खोकेवीरांची वर्षपूर्ती'; शिंदे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

'ही तर खोकेवीरांची वर्षपूर्ती'; शिंदे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

googlenewsNext

लातूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मंगळवारी गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. शिंदे सरकार अस्तित्वात येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. ही सरकारची वर्षपूर्ती नसून खोकेवीरांची वर्षपूर्ती आहे. असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनात्मक गद्दार दिवस साजरा करण्यात आला.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. आम्ही स्वाभिमानी मराठी,गद्दार पठवू गुहाटी...! चले जाव-चले जाव... गद्दार गुहाटी चले जाव..! अशा घोषणांनी सरा परिसर यावेळी निघाला होता. महाराष्ट्र त्रस्त खोके घेऊन गद्दार मस्त...,पन्नास खोके माजलेत बोके... गद्दार हटाव महाराष्ट्र बचाव.. महाराष्ट्रातून गद्दार होणार हद्दपार...!खोके सरकारचा चालणार नाही थाट..गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट..!पन्नास खोके गद्दार नॉट ओके... सरकार हाय हाय गद्दारांना येथे जागा नाय अशा घोषणांनी गांधी चौक परिसरात जाणून गेला होता. याच घोषणांचे फलक हातात घेऊन शिंदे सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.

या आंदोलनामध्ये पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेखाताई कदम, माजी नगराध्यक्ष अड. व्यंकट बेद्रे, माजी नगरसेवक नवनाथ आल्टे, इब्राहिम सय्यद, रघुनाथ कुचेकर, युवक अध्यक्ष भरत सूर्यवंशी, सोहम गायकवाड, रामभाऊ रायेवार, विशाल विहिरे, प्रवीणसिंह थोरात, गोविंद जाधव,डी. उमाकांत, शिवाजी शिंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी, नवनाथ भोसले, बबलू गायकवाड, उमेश बारकुले आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title: 'This is the birthday of the 50 khoke ekdum okay'; NCP movement against Shinde government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.