लातुरातील भक्तिनगरमध्ये साडेतीन लाखांची घरफाेडी
By राजकुमार जोंधळे | Published: April 4, 2023 07:15 PM2023-04-04T19:15:50+5:302023-04-04T19:16:04+5:30
चोरट्यांनी राेकड, साेन्याचे दागिने लंपास केले
लातूर : अज्ञात चाेरट्यांनी बंद घर फाेडून राेख रक्कम आणि साेन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना लातुरातील साईराेड येथील भक्तिनगर भागात ३ एप्रिल राेजी घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अनंत हरिश्चंद्र सूर्यवंशी (वय ३७ रा. व्हटी, ता. रेणापूर) हे सध्याला साई राेड येथील भक्तिनगर भागात वास्तव्याला आहेत. साेमवारी ते राहत्या घराला फिर्यादी व फिर्यादीची पत्नी, मुले घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले असताना काेणीतरी अज्ञात चाेरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकाेंड्याचा स्क्रू काढून, कडीकाेंडा बाजूला करून आत प्रवेश केला. ५५ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, राेख रक्कम १ लाख ५० हजार असा एकूण ३ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. घटनास्थळी एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक लाेखंडे करत आहेत.