दाेघा आराेपींकडून घरफाेडीतील साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: November 7, 2022 06:49 PM2022-11-07T18:49:36+5:302022-11-07T18:50:14+5:30
लातुरातील घटना : आरोपींना तीन दिवसांची पाेलीस काेठडी
लातूर : घरफाेडीतील ३ लाख १२ हजार आणि पाच माेबाईल अशा ३ लाख ६५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दाेघांना पाेलिसांनी अटक केली. ही घटना २४ ऑक्टाेबर राेजी लातुरातील आयाेध्या काॅलनीत घडली हाेती. दरम्यान, याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. दाेघांनाही लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ८ नाेव्हेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील आयोध्या कॉलनीतील एका घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत कपाटात ठेवलेली रोख रक्कम ३ लाख ७५ हजार पळविली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला हाेता. याच्या तपासाबाबत वरिष्ठांनी सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार विवेकानंद ठाण्याचे पथक आराेपींचा शाेध घेत हाेते. यावेळी खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे लातुरातील अक्षय राम तेलंगे (वय २२, रा. गाेपाळनगर) आणि याेगश उर्फ शक्ती अशाेक गुरणे (वय २५, रा. माताजी नगर) यांना ताब्यात घेतले. दाेघांचीही अधिक कसून चाैकशी केली असता, त्यांनी घरफाेडीसह इतर गुन्ह्यांची कबुली दिली. घरफाेडीतील राेख ३ लाख १२ हजार, पाच माेबाईल असा एकूण ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ८ नाेव्हेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली. अधिक तपास सपोनि. भाऊसाहेब खंदारे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, रामचंद्र ढगे, संजय कांबळे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, विनोद चलवाड, दयानंद सारुळे, रमेश नामदास, खंडू कलकत्ते, वाजिद चिकले, दीपक बोंदर, तुकाराम भोसले, नारायण शिंदे, मुन्ना नलवाड, संतोष देवडे, गणेश साठे यांच्या पथकाने केली.