लातुरात एकाच रात्री तीन हॉटेल्स फोडले! राेकड पळविली : एका चाेरट्याला अटक

By राजकुमार जोंधळे | Published: August 20, 2023 07:30 PM2023-08-20T19:30:42+5:302023-08-20T19:30:50+5:30

सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हिआर पळविले...

Three hotels were broken into in one night in Latur! Money stolen: One arrested | लातुरात एकाच रात्री तीन हॉटेल्स फोडले! राेकड पळविली : एका चाेरट्याला अटक

लातुरात एकाच रात्री तीन हॉटेल्स फोडले! राेकड पळविली : एका चाेरट्याला अटक

googlenewsNext

लातूर : एकाच रात्री तीन हाॅटेल्स फाेडल्याची घटना लातुरातील मलंग गल्ली, लाेकशाहीर आण्णाभाउ साठे चाैकात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी एका संशयीत चाेरट्याला १२ तासाच्या आत अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील लाेकशाहीर आण्णाभाउ साठे चाैकातील दाेन हाॅटेल आणि मलंग गल्लीतील एक हाॅटेलचे शटर चाेरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. या तीनही हाॅटेलमधील गल्ल्यात ठेवलेली राेख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हिआर असा ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना एकाच रात्री घडल्याने व्यावयासायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी गांधी चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी भेट देवून पंचनामा केला. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हिआर पळविले...

चाेरीच्या घटनेतील आराेपींच्या अटकेसाठी पाेलिसांनी रेकाॅर्डवरील चाेरट्यांचा शाेध घेतला असता, राजर्षी शाहू महाराज चाैक परिसरात राहणाऱ्या एका संशीयीताला पाेलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली. अटकेतील चाेरट्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी दिली.

Web Title: Three hotels were broken into in one night in Latur! Money stolen: One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.