तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:22+5:302020-12-22T04:19:22+5:30
जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे गावा- गावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची म्हणून ...
जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे गावा- गावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची म्हणून तिरुका ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. दरम्यान, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात तंटे होऊ नयेत तसेच गावचा विकास व्हावा म्हणून ग्रामपंचायत बिनविराेध काढण्याचे आवाहन केले होते. ज्या ग्रामपंचायती बिनविराेध निघतील, अशा ग्रामपंचायतींचा गौरव करुन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. राज्यमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत गावातील मारुती पांडे, बालाजी पाटील, श्रीकृष्ण पाटील यांच्यासह गावातील प्रमुख मंडळी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ आहे. जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.