आज पोलीस भरतीसाठी १७२ उमेदवारांची दांडी; गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी... ​​​​​​​

By राजकुमार जोंधळे | Published: January 3, 2023 07:20 PM2023-01-03T19:20:24+5:302023-01-03T19:22:13+5:30

बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर २ ते १० जानेवारीदरम्यान पाेलिस भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

Today, 172 candidates are absent for police recruitment in Latur; No chance again if absent...​​​​​​​​ | आज पोलीस भरतीसाठी १७२ उमेदवारांची दांडी; गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी... ​​​​​​​

आज पोलीस भरतीसाठी १७२ उमेदवारांची दांडी; गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी... ​​​​​​​

googlenewsNext

लातूर : जिल्हा पाेलिस दलातील २९ रिक्त पदांची चालक पाेलिस शिपाई भरती प्रक्रिया साेमवार, २ जानेवारीपासून बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर पहाटे ५ वाजल्यापासून सुरू झाली आहे. मंगळवारी कागदपत्र पडताळणी, शारीरिक माेजमाप आणि चाचणीसाठी बाेलाविण्यात आलेल्या २८८ उमेदवारांपैकी तब्बल १७२ पुरुष उमेदवारांनी दांडी मारली आहे.

बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर २ ते १० जानेवारीदरम्यान पाेलिस भरती प्रक्रिया राबविली जात आहे. साेमवारी पहाटे ५ वाजता एकूण ३५० पुरुष उमेदवारांना बाेलाविण्यात आले हाेते. त्यातील २२० उमेदवारांनी दांडी मारली. केवळ १३० उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक माेजमाप आणि शारीरिक चाचणी झाली. मंगळवारी एकूण २८८ जणांना बाेलावले हाेते. त्यातील १७२ उमेदवारांनी दांडी मारली. उर्वरित ११६ जणांनी मैदानावर हजेरी लावली. साेमवारी १३० उमेदवारांपैकी अनेक उमेदवार हे कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक माेजमाप (छाती/उंची) चाचणीत अपात्र ठरलेले आहेत. उर्वरित उमेदवार हे शारीरिक मैदानी (१६०० मीटर धावणे आणि गाेळाफेक) चाचणीसाठी पात्र ठरले. त्यांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात आली.

२४२ उमेदवारांची मैदानी चाचणी...
मंगळवारी २८८ पैकी ४६ उमेदवार हे कागदपत्र पडताळणी, शारीरिक माेजमाप (छाती/उंची) चाचणीत अपात्र ठरलेले आहेत. उर्वरित २४२ पुरुष उमेदवार हे शारीरिक मैदानी (१६०० मीटर धावणे व गाेळाफेक) चाचणीसाठी पात्र झाल्याने त्यांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात आली असून, त्यात उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर पाेलिस अधीक्षक कार्यालयातही दर्शनी भागावर डकविण्यात आली आहे.

गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी...
पाेलिस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना बाेलाविण्यात आलेल्या त्या-त्या तारखांना मैदानावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. जे उमेदवार भरतीसाठी गैरहजर राहितील त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही, अशी माहिती पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिली.

Web Title: Today, 172 candidates are absent for police recruitment in Latur; No chance again if absent...​​​​​​​​

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.