महामार्गावरील गाेदाम फाेडले; अडीच लाखांचे साेयाबीन पळविले
By राजकुमार जोंधळे | Published: December 20, 2022 06:00 PM2022-12-20T18:00:59+5:302022-12-20T18:01:22+5:30
लाेखंडी खिडकी ताेडून केला चाेरट्यांनी आत प्रवेश
लातूर : औसा राेडवरील पेठ परिसरात असलेले वेअर हाउस गाेदाम अज्ञात चाेरट्यांनी फाेडल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, चाेरट्यांनी जवळपास २ लाख ३३ हजार ६८० रुपयांचे ७९ कट्टे (५१ किलाे वजन) पळविले. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी आश्विन विजयकुमार मुंदडा (वय ४५, रा. आदर्श काॅलनी, लातूर) यांचे पेठ परिसरात आश्विन वेअर हाउस गाेदाम आहे. दरम्यान, १७ डिसेंबर राेजी अज्ञात चाेरट्यांनी गाेदामाच्या दक्षिण बाजूची लाेखंडी खिडकी ताेडून आत प्रवेश केला. आतून शटरचे लाॅक ताेडून शटर वर करून आतील साेयाबीनचे एकूण ७९ कट्टे असा एकूण २ लाख ३३ हजार ६८० रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
माेठ्या चलाखीने फाेडले गाेदाम...
लातूर ते औसा महामार्गालगत असलेल्या गाेदामावर चाेरट्यांनी अनेक दिवसांपासून नजर ठेवली असावी, असा पाेलिसांचा अंदाज आहे. गाेदामाची देखरेख केल्यानंतर तेथील सुरक्षेचा अंदाज घेत हे गाेदाम फाेडण्याचा त्यांनी प्लॅन केला असावा. त्यानंतरच त्यांनी गाेदामाच्या पाठीमागील लाेखंडी खिडकी ताेडून चाेरट्यांनी आत प्रवेश करत साेयाबीन पळविले.