पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:48+5:302021-09-05T04:24:48+5:30
शहरासह तालुक्यात सायंकाळी ४.४५ वा. च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर मोठा पाऊस झाला. त्यानंतर थोडीशी विश्रांती दिली ...
शहरासह तालुक्यात सायंकाळी ४.४५ वा. च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर मोठा पाऊस झाला. त्यानंतर थोडीशी विश्रांती दिली आणि पुन्हा पावसाचा जोर वाढला. संततधार पाऊस सुरु होता. पावसामुळे रेणापूरपासून जाणाऱ्या पानगाव, खरोळा, कामखेडा या तिन्ही रस्त्यांवरील छोट्या पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. दरम्यान, शहरातील संभाजीनगर भागामधील नालीच्या बाजूस असलेल्या घरांत पाणी शिरले.
दोन वाहने उलटली...
रेणापूर शहरातून पिंपळफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. पावसामुळे दुभाजकावर वाहने धडक आहेत. सायंकाळी ६.३० वा. एक चारचाकी तर ७.३० वा. पुन्हा एक टेम्पो दुभाजकास धडकून उलटला. दुर्दैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. संबंधितांनी सदरील ठिकाणी दिशादर्शन फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.