आयएमएच्यावतीने पोलिसांसाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:47+5:302021-07-23T04:13:47+5:30
तेलंगणा येथे एका ट्रॅफिक पोलिसाने एका व्यक्तीचे प्राण सीपीआर देऊन वाचवले होते. त्यामुळे आयएमएने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर ...
तेलंगणा येथे एका ट्रॅफिक पोलिसाने एका व्यक्तीचे प्राण सीपीआर देऊन वाचवले होते. त्यामुळे आयएमएने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या सहकार्यातून शिबिराचे आयोजन केले. यावेळी आयएमएच्या अध्यक्षा सुरेखा काळे यांनी जीवन संजीवनी योजनेचे महत्त्व सांगितले. पाच मिनिटांत आपण एखाद्या बेशुद्ध माणसाचे प्राण रुग्णवाहिका येईपर्यंत वाचवू शकतो. सीपीआर कोणीही प्रशिक्षित व्यक्ती देऊ शकतो. पण तो कधी आणि कुणाला द्यावा, याची शास्त्रीय माहिती देण्यात आली. हे प्रशिक्षण दोन विभागांत देण्यात आले. पोलिसांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे यावेळी देण्यात आली. याप्रसंगी डॉ. अंजली कवठाळे, डॉ. कल्याणी सास्तूरकर, डॉ. स्वाती कवळास, डॉ. चित्रा इंगळे, डॉ. सुदर्शन गुंठे यांनी प्रशिक्षण दिले. पोलीस मुख्यालय येथील खंदाडे, गायकवाड यांनी शिबिरासाठी मदत केली.