लातूर जिल्ह्यात २० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

By राजकुमार जोंधळे | Published: February 4, 2023 07:20 PM2023-02-04T19:20:21+5:302023-02-04T19:22:32+5:30

दहा सहायक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या...

Transfer of 20 police officers in Latur district! | लातूर जिल्ह्यात २० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

लातूर जिल्ह्यात २० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Next

लातूर : जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, अशा एकूण २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षकांनी जारी केले आहेत.

लातूर एमआयडीसी पाेलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांची बदली शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. एमआयडीसी ठाण्यात उदगीर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांची बदली केली आहे. उदगीर शहर पोलिस ठाण्यात जळकोट येथील पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, तर लातूर शहर वाहतूक शाखेतून सुनील बिर्ला यांची बदली जळकोटला केली आहे. लातूर वाहतूक शाखेत लातूर ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कदम यांची बदली केली आहे. उदगीर ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांची बदली लातूर ग्रामीण ठाण्यात केली आहे. उदगीर नियंत्रण कक्षातील पाेलीस निरीक्षक अरविंद पवार यांना उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे दिले आहे. सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले दिलीप डोलारे यांची बदली आता आर्थिक गुन्हे प्रकटीकरण शाखेत करण्यात आली आहे. सोपान सिरसाठ यांची विशेष शाखेत बदली केली आहे, तर शिरूर अनंतपाळ ठाण्याचे रामेश्वर तट यांची बदली थेट नियंत्रण कक्षात केली आहे.

दहा सहायक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या...
नांदेड येथून काही दिवसांपूर्वीच लातूर शिवाजीनगर ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठाेड यांची बदली शिरूर अनंतपाळला केली. राठाेड यांच्यासह दहा सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. कासारशिरसी पोलिस ठाण्याचे रेवनाथ डमाळे यांची अपर पोलिस अधीक्षक यांचे रीडर म्हणून, तर किल्लारीचे सुनील गायकवाड यांची निलंगा येथे बदली केली आहे. विवेकानंद चाैक ठाण्याचे सपाेनि बी. बी. खंदारे किनगाव, तर किनगावचे शैलेश बंकवाड यांची अहमदपूर येथे बदली केली आहे. रियाझ शेख यांची कासार शिरसी, अपर पोलिस अधीक्षक यांचे रीडर नाना लिंगे यांची किल्लारी येथे बदली केली आहे. रामचंद्र केदार यांची अहमदपूर येथून विवेकानंद चाैक लातूर येथे, विशाल शहाणे यांची शिवाजीनगर, संदीपान कामत यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली केली आहे.

Web Title: Transfer of 20 police officers in Latur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.