लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:54+5:302021-09-02T04:43:54+5:30

लातूर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाळकृष्ण शेजाळ, प्रेमप्रकाश माकाेडे, सुधाकर बावकर, अंगद सुटके, अशाेक बेले यांचा समावेश आहे. ...

Transfers of 57 police officers in Latur district | लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next

लातूर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाळकृष्ण शेजाळ, प्रेमप्रकाश माकाेडे, सुधाकर बावकर, अंगद सुटके, अशाेक बेले यांचा समावेश आहे. यातील सुधाकर बावकर यांची पाेलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पाेलीस ठाण्याशी संलग्न असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेत कायम करण्यात आले आहे, तर साेपान शिरसाट यांची चाकूर येथून रेणापूर येथे बदली करण्यात आली आहे. देवणी येथील पाेलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांची ए.एच.यू.टी, लातूर येथे बदली करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक प्रफुल्ल हणमंतराव अंकुशकर यांची उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक दयानंद पाटील यांची विवेकानंद चाैक येथून शिवाजीनगर, बाळासाहेब नरवटे यांची वाढवणा येथून पाेलीस कल्याण, विलास नवले - गातेगाव येथून भादा, राहुल बहुरे यांची औसा येथून स्थानिक गुन्हे शाखा, लातूर, दीपाली गिते यांची भराेसा सेल येथून एमआयडीसी लातूर, नाना लिंगे यांची भादा येथून वाचक शाखा, अशाेक घारगे यांची उदगीर ग्रामीण येथून गातेगाव, भाऊसाहेब खंदारे यांची वाचक शाखेतून विवेकानंद चाैक लातूर, उदय सावंत यांची निलंगा येथून जिल्हा विशेष शाखा, लातूर, प्रतीभा ठाकूर यांची अहमदपूर येथून लातूर ग्रामीण, नाैशाद पठाण यांची उदगीर ग्रामीण येथून वाढवणा येथे बालाजी ताेटेवाड यांची नियंत्रण शाखा, लातूर येथून टी.एम.सी. लातूर आणि मेघा निंबाळकर यांची भराेसा सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्या प्रशाकीय, विनंतीवरून करण्यात आल्या आहेत.

३३ पाेलीस उपनिरीक्षकांचाही समावेश...

जिल्हा पाेलीस दलातील ३३ पाेलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नीलम घाेरपडे, उत्तम गुंठे, प्रताप गर्जे, बालाजी पल्लेवाड, धनंजय जाधव, गजानन पाटील, लक्ष्मण काेमवाड, कल्याण नेहरकर, गणेश गायके, शहादेव खेडकर, गजानन क्षीरसागर, रणजित काथवटे, महेश मुळीक, कविता जाधव, मल्लय्या स्वामी, आवेश काझी, तानाजी चेरले, प्रभाकर अंधाेरीकर, आयुब शेख, संदीप कराड, श्यामल देशमुख, मुस्तफा परकाेटे, शिवाजी शिंदे, जिलानी मानुल्ला, मुजाहिद शेख, बालाजी आटरगे, व्यंकटेश कुलकर्णी, गाेविंद हजारे, तुळसीराम राेकडे, महेश गळगटे, प्रकाश शिंदे, सुरेश नरवाडे, राजाभाऊ जाधव यांचा समावेश आहे.

Web Title: Transfers of 57 police officers in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.