चालकाला लागली डुकली; ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढली

By राजकुमार जोंधळे | Published: June 21, 2024 11:24 AM2024-06-21T11:24:48+5:302024-06-21T11:25:47+5:30

लातूर-औसा महामार्गावर सकाळी 6:30 वाजताचा अपघात

Travels met with an accident near Latur | चालकाला लागली डुकली; ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढली

चालकाला लागली डुकली; ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढली

लातूर : पुण्याहून लातूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रॅव्हल्स चालकाला डुकली लागल्याने ट्रॅव्हल्स महामार्गावरील दुभाजकावर नागमोडी वळण घेत चढली. हा अपघात शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता पेठ गावानजीकच्या किडीज इन्फो पार्क इंग्रजी शाळेसमोर घडला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

पुणे येथून गुरुवारी रात्री लातूरकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास औसाकडून लातूरच्या दिशेने निघाली होती. पेठ गाव ओलांडल्यावर चालकाला डुकली लागली. ट्रॅव्हल्स नागमोडी वळण घेत असल्याचा प्रकार चलकाशेजारी बसलेल्या किन्नरच्या लक्षात आला. प्रसंगावधान राखून त्याने ट्रॅव्हल्सचे स्टेअरिंग एका हाताने हाताळले. भरधाव ट्रॅव्हल्स महामार्गावरील दुभाजकावर चढली आणि पुन्हा महामार्गावरील विरुद्ध दिशेवर आली. समोर किडीज इन्फो पार्क इंग्रजी शाळेचे प्रवेशद्वार होते. स्कुलबस आणि त्यांचे चालक थांबले होते. परिणाम, किन्नरने पुन्हा स्टेअरिंग हाताळत ट्रॅव्हल्स विरुद्ध दिशेला नेली आणि दुभाजकाला घासत पुन्हा दुभाजकावर चढली आणि जाग्यावर थांबली. हा प्रकार ट्रॅव्हल्समधील प्रवाशांनी आंखो देखा हाल पहिला... आणि जीव भांड्यात पडला. 

योगदिनानिमित्त शाळा भरली सकाळी 6:30 वाजता...

महामार्गाजीक असलेली इंग्रजी शाळा दररोज 8:30 वाजता भरते. मात्र, आज शुक्रवारी योग दिनानिमित्त शाळा सकाळी 6:30 वाजता भरली होती. या अपघातवेळी महामार्गावर विद्यार्थ्यांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: Travels met with an accident near Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात