रिक्षावर झाड कोसळले; चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:30+5:302021-07-23T04:13:30+5:30
लातूर शहर व जिल्ह्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. अनेक झाडे कोसळत आहेत. मुरुड-बार्शी रस्त्यावरही एक, दोन झाड ...
लातूर शहर व जिल्ह्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. अनेक झाडे कोसळत आहेत. मुरुड-बार्शी रस्त्यावरही एक, दोन झाड उन्मळून पडल्याची घटना आहे. लातूृर शहरामध्ये अनेक ठिकाणी झुकलेली जुनी झाडे आहेत. काही झाडांच्या फांद्या वाळलेल्या पडण्याच्या स्थितीत असून, अशी झाडे अथवा धोकादायक इमारती तोडण्यासंबंधात महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
रिक्षा चालकाच्या कुटुंबास आर्थिक मदत करा
प्रवासी वाहतूक करीत असताना झाड कोसळून रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे ऑटो चालकाचे कुटुंब उघड्यावर आले आहे. चालकाच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्रिंबक स्वामी, शहर उपाध्यक्ष गुणवंत खोडतोडे, जिल्हा सचिव बंडूसिंग भाट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो कॅप्शन :
लातूर शहरातील ज्ञानप्रकाश शाळेजवळ ऑटो रिक्षावर झाड कोसळून ऑटो चालकाचा मृत्यू झाला.
फोटो फाईल नेम :
२२एलएचपी ट्री. टीफ / जेपीजी