हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

By हरी मोकाशे | Published: September 30, 2022 03:45 PM2022-09-30T15:45:17+5:302022-09-30T15:46:14+5:30

किल्लारीतील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन काळा दिवस पाळला.

Tribute to Killari earthquake victims by firing three gun rounds in the air | हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

Next

किल्लारी (जि. लातूर) : ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे झालेल्या प्रलयकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना शुक्रवारी श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील स्मृतीस्तंभाजवळ पोलीस दलाच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीनदा फैरी झाडून श्रध्दांजली वाहिली. दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन काळा दिवस पाळला.

शुक्रवारी सकाळी ८.३० वा. स्मृतीस्तंभाजवळ आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार लाला कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, सपोनि सुनील गायकवाड, पीएसआय प्रशांत राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच युवराज गायकवाड, औसा बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक किशोर जाधव, ग्रामविकास अधिकारी तुकाराम सूर्यवंशी, बंकट पाटील आदींनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी लातूरच्या पोलीस कार्यालयातील आर.एस. डी.डी. माने यांच्या ११ पथकाने धून वाजवून व हवेत आठ रायफलीच्या तीनदा फायरिंग करुन सलामी दिली. यावेळी तलाठी हाळनूर, दत्ता पांचाळ, मंडळ अधिकारी शेख, डॉ. संजय मोरे, प्राचार्य डी.टी. कांबळे, प्रा. नंदकुमार माने, औंढे, डॉ. शंकरराव परसाळगे, दीपक पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रकाश पाटील, बिसरसिंग ठाकुर, किरण बाबळसुरे, रमेश हेळंबे, वहिखाँ पठाण, प्रा. हरिश्चंद्र कांबळे, जयपाल भोसले, व्यंकट मुळजे, सतीश भोसले, देवस्थानचे अध्यक्ष अशोक गावकरे, संजय कोराळे आदी उपस्थित होते.

किल्लारीतील बाजारपेठ बंद...
शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन काळा दिवस पाळला. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. बहुतांश घरांमध्ये श्रध्दांजली वाहण्यात येत होती. दरम्यान, आ. अभिमन्यू पवार यांनी भूकंपग्रस्तांच्या मुलभूत सुविधा सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.

Web Title: Tribute to Killari earthquake victims by firing three gun rounds in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.