डांबरीकरणाचे काम रखडल्याने अपघात वाढले; किनगाव - कारेपूर मार्गावर ट्रक उलटला!

By राजकुमार जोंधळे | Published: September 7, 2022 01:12 PM2022-09-07T13:12:08+5:302022-09-07T13:12:42+5:30

रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावर टाकलेली गिट्टी पसरत असून, वाहनधारकांना  गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

Truck overturned on Kingaon-Karepur road in Latur | डांबरीकरणाचे काम रखडल्याने अपघात वाढले; किनगाव - कारेपूर मार्गावर ट्रक उलटला!

डांबरीकरणाचे काम रखडल्याने अपघात वाढले; किनगाव - कारेपूर मार्गावर ट्रक उलटला!

googlenewsNext

किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील किनगाव ते कारेपूर मार्गे लातूरला जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून, डांबरीकरणाचे काम करण्यासाठी रस्त्यावर गिट्टी फोडण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध गिट्टी पसरल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या मार्गावर ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी घडली. 

किनगाव ते कारेपूर मार्गे लातूर हा जवळचा रस्ता असल्याने वाहनाची वर्दळ असते. सताळा फाटा ते कारेपूरपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यासाठी रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावर टाकलेली गिट्टी पसरत असून, वाहनधारकांना  गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावर गिट्टीने अपघातात...
मंगळवारी लातूरकडून किनगावकडे एक मालवाहतूक ट्रक येत असताना किनगाव परिसरात असलेल्या तलावालगत मंगळवारी ट्रक उलटला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, रस्त्यावरील गिट्टी काढून, रस्ता दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Truck overturned on Kingaon-Karepur road in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.