शिरुर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:53+5:302020-12-17T04:44:53+5:30
तालुक्यात एकूण ४२ ग्रामपंचायती असून, त्यापैकी मोठ्या असलेल्या २७ ग्रामपंचायतींची मुदत जुलै २०२० अखेर संपली होती. त्यामुळे या २७ ...
तालुक्यात एकूण ४२ ग्रामपंचायती असून, त्यापैकी मोठ्या असलेल्या २७ ग्रामपंचायतींची मुदत जुलै २०२० अखेर संपली होती. त्यामुळे या २७ ग्रामपंचायतींचा कार्यभार पंचायत समितीतील ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याकडे चार महिन्यांपासून सोपविण्यात आला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ ते ३० डिसेंबर या सात दिवसांच्या कालावधीत नामांकन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी नामांकन पत्राची छाननी केली जाणार आहे. ४ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वा. नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. २१ जानेवारीपासून नवीन पदाधिकाऱ्यांचा कारभार सुरू होणार आहे.
साकोळ, येरोळकडे लक्ष...
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यात साकोळ, येरोळ, हिप्पळगाव, डिगोळ, तळेगाव (दे), धामणगाव, हालकी, लक्कडजवळगा, अंकुलगा (स.), कळमगाव, शिवपूर, बोळेगाव (बु.), कानेगाव, कांबळगा, सुमठाणा, चामरगा, शेंद (उत्तर), डोंगरगाव (बो.), जोगाळा, होनमाळ, बिबराळ, कारेवाडी, सांगवी घुग्गी, थेरगाव, तिपराळ, उमरदरा, भिंगोली यांचा समावेश आहे.