पानगावातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:49+5:302021-01-10T04:14:49+5:30
रेणापूर तालुक्यातील पानगाव हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गत ग्रामपंचायत निवडणुकीत विविध आश्वासने देण्यात आली होती; परंतु त्याची पूर्तता ...
रेणापूर तालुक्यातील पानगाव हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गत ग्रामपंचायत निवडणुकीत विविध आश्वासने देण्यात आली होती; परंतु त्याची पूर्तता करण्यात आली नाही. गावातील सर्व विद्युत खांबांवर पथदिवे बसवावेत. दररोज नळाला पाणी सोडावे. दिव्यांगांना ग्रामनिधीतून ५ टक्के रक्कम द्यावी, उल्हासनगर येथे मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या बोअरमध्ये मोटार सोडण्यात यावी. १५ व्या वित्त आयोगातून दिव्यांगांच्या बचत गटावर निधी जमा करावा, गावात ग्रामपंचायतीतर्फे वाचनालय सुरू करावे, प्रभाग ५ मधील आशा कार्यकर्तीचे पद चार वर्षांपासून रिक्त असून ते तत्काळ भरावे, दत्त मंदिर परिसरात व खंडोबा मंदिर येथे पेव्हर ब्लाॅक बसवावा. खरोळा फाटा ते पानगाव येथील सीमेपर्यंत रखडलेल्या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा. ग्रामपंचायतीचे सर्व आरो फिल्टर पाणी प्लॅन्ट सुरू ठेवावेत. पानगावात ग्रामीण रुग्णालयासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
गावातील प्रलंबित प्रश्न तत्काळ न सोडविल्यास मनसेच्या वतीने येथील ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी, सरपंचांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य इम्रान मनियार, चेतन चौहान, अविनाश वाघमारे, आसिफ शेख, गौस शेख, आदींच्या सह्या आहेत.