बारावीतील विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, शहरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 08:50 AM2022-01-24T08:50:07+5:302022-01-24T08:50:36+5:30
लातुरात खळबळ : पाच मित्रांना अटक
लातूर : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लातुरातील विशालनगर भागात भररस्त्यावर घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतले आहे.
राेहन सुरेश उजळंबे (२०) हा मूळचा लाेदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. ताे बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत हाेता. विशालनगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर रविवारी दुपारी ताे थांबला हाेता. यावेळी माेटारसायकलवरून आलेल्या दाेघांपैकी एकाने राेहनच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ताे गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर काेसळला. त्यानंतर मारेकरी माेटारसायकलवरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पाेलिसांनी तातडीने त्याच्या वर्तुळातील पाच मित्रांना ताब्यात घेत चाैकशी सुरू केली आहे. खुनामागचे कारण मात्र अद्याप समाेर आले नाही. मयत राेहन उजळंबे आणि मारेकऱ्यामध्ये नेमका काय वाद हाेता? याचा शाेध पाेलिसांकडून घेतला जात आहे. - निखिल पिंगळे,
पाेलीस अधीक्षक, लातूर