बनावट कागदपत्रावर बारा काेटींचे कर्ज ! कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा; लातूर न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 06:58 PM2021-11-11T18:58:36+5:302021-11-11T18:59:36+5:30
२००४ मध्ये राजलक्ष्मी पेट्राेकेम प्रा. लि. या कंपनीसाठी औद्याेगिक वसाहतीचे ना हरकत घेऊन लघुउद्याेग बॅंक, मुंबई यांच्याकडे ताे प्लाॅट तारण दिला हाेता.
लातूर : बारा काेटी रुपयांच्या कर्जासाठी बनावट कागदपत्रे तयार करून लातुरातील उद्याेजकाची मालमत्ता एका कंपनीने तारण ठेवल्याचे उजेडात आले आहे. दरम्यान, त्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायाधीश यु. ए. भाेसले यांनी दिले आहेत.
ॲड. नीलेश जाजू, ॲड. व्यंकट नाईकवाडे यांनी सांगितले की लातूर येथील प्रसिद्ध उद्याेजक विनाेदकुमार रामगाेपालजी गिल्डा यांनी उद्याेगभवन परिसरात प्लाॅट घेतला हाेता. दरम्यान, २००४ मध्ये राजलक्ष्मी पेट्राेकेम प्रा. लि. या कंपनीसाठी औद्याेगिक वसाहतीचे ना हरकत घेऊन लघुउद्याेग बॅंक, मुंबई यांच्याकडे ताे प्लाॅट तारण दिला हाेता. २०१४ मध्ये कर्ज परतफेड झाल्यानंतर लघुउद्याेग बॅंकेने परत दिलेली कागदपत्रे परस्पर मिळवून लातूरमधीलच उद्याेजकाने राजलक्ष्मी पेट्राेकेम प्रा. लि. कंपनीसाठी जनता सहकारी बॅंक, पुणे यांच्याकडून बारा काेटींच्या कर्जासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ज्यावेळी विनाेदकुमार गिल्डा यांना अन्य व्यवहारासाठी प्लाॅटची मूळ कागदपत्रे हवी हाेती. त्यावेळी उपराेक्त कंपनीच्या उद्याेजकाने ती देण्यास टाळाटाळ केली. शेवटी गिल्डा यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम पाेलिसांकडे धाव घेतली. नंतर न्यायालयाचा दरवाजा ठाेठावला. प्रकरणाचा तपशील पाहून न्यायाधीश भाेसले यांनी राजलक्ष्मी पेट्राेकेम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून चाैकशी करा, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणात गिल्डा यांच्या वतीने ॲड. जाजू व ॲड. नाईकवाडे काम पाहत आहेत.
गुन्हा दाखल हाेणार...
शिवाजीनगर पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून चाैकशी केली जाईल. रात्री उशिरापर्यंत सर्व कागदपत्रे हाती येतील व गुरुवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण हाेईल, असेही ते म्हणाले.