उदगीरच्या दरोड्यातील दोन आरोपींना परळीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:15 PM2019-05-19T22:15:27+5:302019-05-19T22:15:30+5:30

आठ दिवसांपूर्वी उदगीरच्या रेल्वे स्टेशनचे अधीक्षक दीपक जोशी यांच्या घरावर दरोडा टाकून आरोपींनी गळ्याला चाकू लावून ७ तोळे सोन्यासह रोख १० हजार रुपये पळविले होते. 

Two of the accused in the Udgir Dock were arrested in Parli | उदगीरच्या दरोड्यातील दोन आरोपींना परळीत अटक

उदगीरच्या दरोड्यातील दोन आरोपींना परळीत अटक

googlenewsNext

उदगीर (जि. लातूर) : आठ दिवसांपूर्वी उदगीरच्या रेल्वे स्टेशनचे अधीक्षक दीपक जोशी यांच्या घरावर दरोडा टाकून आरोपींनी गळ्याला चाकू लावून ७ तोळे सोन्यासह रोख १० हजार रुपये पळविले होते. या प्रकरणातील पाचपैकी दोन आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसांनी परळी येथून रविवारी अटक केली. अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट म्हणाले, शहराच्या उपनगर भागात रेल्वेलाईन शेजारील वस्त्यांमध्ये काही दिवसांपासून घरफोडी व दरोड्याचे सत्र सुरू होते. एसटी कॉलनीतील शिवनगर भागात राहणारे रेल्वेचे स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी दरोडा टाकून ७ तोळे सोने व १० हजार लुटल्याची घटना घडली होती.
या गुन्ह्यातील करतारसिंग अचोलसिंग दुधानी (रा. लातूर रोड) याच्यासह अन्य एकास परळी येथून अटक करण्यात आली आहे. एकूण पाच जणांनी घरफोड्या व दरोडा टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर हिरमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नियुक्त केले होते. पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, बाबासाहेब थोरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस नामदेव सारोळे, चंद्रकांत कलमे, कैलास चौधरी, अजय भंडारे, बालाजी चौधरी यांचा समावेश होता.
रेल्वेने येऊन चोरी करायचे
सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. एक आरोपी परभणीचा असून दुसरा परळीचा आहे़ तिसºयाचा तपास सुरू आहे. हे आरोपी नेहमी रात्री १़३० वा़ उदगीरला येणाºया रेल्वेने शहरात यायचे. चो-या करून पहाटे निघून जायचे. उदगीर ग्रामीणसह लातूर, बीड, परभणी व शेजारील बीदर जिल्ह्यातील पोलिसांसाठी हे आरोपी वॉन्टेड असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Two of the accused in the Udgir Dock were arrested in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.