शिवाजी महाविद्यालयातर्फे अडीच लाखांचे अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:51+5:302021-07-04T04:14:51+5:30
कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशाची अर्थव्यवस्था विस्कटली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत हे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आल्याचे प्राचार्य ...
कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशाची अर्थव्यवस्था विस्कटली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत हे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. आर.एस. अवस्थी यांनी सांगितले. जेव्हा-जेव्हा राज्य, देशात संकट असते, तेव्हा येथील शिवाजी महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्याचे कार्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशाकीय समन्वयक संचालक नीळकंठ पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजी पाटील, दत्तात्रय गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अर्थव्यवस्था विस्कटली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ दिवसांचे वेतन २ लाख ६६ हजार ४९३ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाइन जमा केला आहे. गतवर्षी महाविद्यालयाने १ लाख ६१ हजारांचा निधी जमा केला होता, असे प्राचार्य डॉ. आर.एस. अवस्थी यांनी सांगितले.