माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:38 PM2022-06-18T19:38:29+5:302022-06-18T19:39:41+5:30

मोबाईल शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरील लोकांना दमदाटी करून हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले.

Two arrested for snatching mobile phones; 1 lakh 93 thousand items including 8 mobiles confiscated | माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

लातूर : दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघाजणांना गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. संबधित आरोपींकडून ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी सांगितले, १६ जुन रोजी गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास उघडकीस आणण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते. १७ जुन रोजी तपास पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की, दोन मुले गांधी चौक मार्केट मधील मोबाईल दुरुस्तीच्या दुकानांमध्ये त्यांच्याकडील मोबाईलला सॉफ्टवेअर मारून मोबाईलचा लॉक तोडण्यासाठी विचारपूस करीत फिरत आहे. दरम्यान, माहितीची शहनिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पथक गांधी चौक मार्केट येथे पोहोचले. त्यांना तेथे दोन मुले संशयितरित्या वावरताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आजिम कासिम सय्यद, २५ वर्ष, रा. शास्त्रीनगर लातूर, सध्या रा. सावेवाडी, तर दुस-याने कृष्णा दिगंबर भोसले, वय २२ वर्ष, रा.गोविंद नगर, कळंब रेल्वे गेट जवळ असे सांगितले.

त्यांची अंगझडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचे आठ मोबाईल आढळून आले. मोबाईल फोन बाबत विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरील लोकांना दमदाटी करून हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक २६७/२०२२ कलम ३९२ भादविमध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचे ८ मोबाईल असा एकूण १ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करीत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रेमकुमार माकुडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार दामोदर मुळे, युसुफ शेख, रणवीर देशमुख, शिवाजी पाटील, दत्ता शिंदे, रणजित शिंदे, गोविंद मुळे, श्रीमंत आरदवाड, अर्जुन डिगोळे यांनी केली.

Web Title: Two arrested for snatching mobile phones; 1 lakh 93 thousand items including 8 mobiles confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.