दिवसाढवळ्या वाटमारी करणाऱ्या टोळीतील दाेघांच्या मुसक्या आवळल्या

By राजकुमार जोंधळे | Published: February 28, 2023 06:26 PM2023-02-28T18:26:24+5:302023-02-28T18:27:40+5:30

खबऱ्याने पथकाला टीप दिली अन् दाेघे पाेलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले.

two arrested from the gang of roadside robbery in Latur | दिवसाढवळ्या वाटमारी करणाऱ्या टोळीतील दाेघांच्या मुसक्या आवळल्या

दिवसाढवळ्या वाटमारी करणाऱ्या टोळीतील दाेघांच्या मुसक्या आवळल्या

googlenewsNext

लातूर : कार अडवून चालकाला जबर मारहाण करत वाटमारी करणाऱ्या टाेळीतील दाेघांच्या पाेलिसांनी मंगळवारी मुसक्या आवळल्या. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून माेबाइल, राेख रक्कम जप्त केली आहे. ही घटना लातुरातील मळवटी रिंगराेड परिसरात २२ फेब्रुवारी राेजी घडली हाेती. दरम्यान, याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, बुधवार (२२ फेब्रुवारी) रोजी दुपारी १:३० वाजता दाेघा अज्ञातांनी एका कार चालकाला मळवटी रिंगराेड परिसरात अडवून मारहाण केली. चालकाकडील मोबाइल आणि रोख रक्कम हिसकावत पळ काढला. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार विवेकानंद चौक पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आराेपींचा माग काढला. फिर्यादीने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, वर्णनावरून ठाण्याच्या रेकाॅर्डवर असलेल्या आराेपींची चाचपणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाेलिस पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली. या माहितीवरून संशयित म्हणून ईश्वर गजेंद्र कांबळे (वय २१) आणि गोविंद रमेश शिंदे (वय २२, दाेघेही रा. जयनगर, रिंगराेड, लातूर) या दाेघांना माेठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलिस उपनिरीक्षक हाजी सय्यद, पोलिस अंमलदार मुनवरखान पठाण, दयानंद सारोळे, सुधीर साळुंखे, विनोद चलवाड, नारायण शिंदे यांच्या पथकाने केली.

खबऱ्याने दिली टीप; दाेघे अडकले जाळ्यात
खबऱ्याने पथकाला टीप दिली अन् दाेघे पाेलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. त्यांची झाडाझडती घेत कसून चाैकशी केली असता, मळवटी रिंगराेड परिसरातून जाणाऱ्या कार चालकाला अडवून लुटल्याची त्यांनी कबुली दिली. तर लुटलेला माेबाइल, राेख रक्कम पाेलिसांच्या ताब्यात दिला. तपास विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करीत आहेत.

यापूर्वी गंभीर ९ गुन्हे दाखल..
गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले गुन्हेगार पोलिस रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. दाेघापैकी एक ईश्वर गजेंद्र कांबळे याच्यावर लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मालमत्ता चोरीसह इतर ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा गोविंद रमेश शिंदे याच्यावर शस्त्र अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल आहे, असे पाेउपनि. महेश गळगटे म्हणाले.

Web Title: two arrested from the gang of roadside robbery in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.