अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले !

By राजकुमार जोंधळे | Published: June 30, 2023 08:05 PM2023-06-30T20:05:23+5:302023-06-30T20:06:00+5:30

दाेघांकडून दहा आराेपींनी १७ लाखांची रक्कम घेतली...

two men from latur Kidnapped and kept in Delhi; police arrested four accused from Delhi | अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले !

अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले !

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील तरुणाला बिझनेस डीलसाठी आधी पुण्यात आणि नंतर विमानाने दिल्लीला बाेलावून घेत डांबून ठेवले. त्याच्या कुटुंबीयांना ४५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. यात पाेलिस पथकाने दिल्लीतून तरुणासह मित्राला डांबून ठेवणाऱ्या दहापैकी चाैघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना दिल्लीतून उचलले आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अनिल यादवराव जाजनूरकर (वय ५९, रा. एलआयसी काॅलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. व्यवसायाच्या बाेलणीसाठी मुलासह मित्राला पुण्यात बाेलावून घेतले. तेथून तुम्ही दिल्लीला विमानाने या, असे सांगण्यात आले. ते दाेघेही विमानाने दिल्लीला गेले. तेथे दहा जणांनी त्यांना डांबून ठेवले. फिर्यादीचा मुलगा आणि मित्राकडून १५ लाख घेतले. त्याचबराेबर आणखी २५ लाखांची मागणी करण्यात आली.

या प्रकरणी पाेलिस अधीक्षक साेयम मुंडे यांनी पथक नियुक्त करून सूचना दिल्या. पाेलिस उपनिरीक्षक महेश गळगटे, सहायक फाैजदार विलास फुलारी, पाेलिस हवालदार दिनेश हवा, सारंग लाव्हरे यांचे पथक तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमधून सागर अनिल जाजनूरकर आणि संदीप जनक मांजरे यांची सुटका केली.

यावेळी संजयकुमार महावीर सिंग (वय ३६, रा. सेक्टर-७ दिल्ली), महेश सतीश अराेडा (वय ४०, रा. पीरमुचल्ला झिरकपूर एसएएस नगर, माेहाली पंजाब), अतुल वीरेंद्र उपाध्याय (वय ३७, रा. मणीमांजरा चंदीगढ), वीरसिंह जयेश रावत (वय ४४, रा. गढवाली माेहल्ला, लक्ष्मीनगर, दिल्ली) यांना अटक करून शुक्रवारी लातुरात आणले.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, उपविभागीय पाेलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेनि. सुधाकर बावकर, पाेउपनि. महेश गळगटे, सपाेनि. रामचंद्र केदार, बालाजी गाेणारकर, विलास फुलारी, दिनेश हवा, सारंग लाव्हारे, संजय बेरळीकर, खंडू कलकत्ते, सय्यद बहादूर, वाजीद चिकले, अनिता सातपुते, गणेश साठे, हल्लाळे, कलबुणे, चालक मरे यांच्या पथकाने केली आहे.

दाेघांकडून दहा आराेपींनी १७ लाखांची रक्कम घेतली...
दिल्लीतील आराेपींनी लातुरातील तरुणासह त्याच्या मित्राचे अपहरण करून १७ लाख रुपयांची मागणी केली. ती रक्कम राेख आणि ऑनलाईन घेतल्याचे पाेलिसांनी सांगितले. यातील इतर सहा आराेपी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पाेलिस पथक मागावर आहे.

Web Title: two men from latur Kidnapped and kept in Delhi; police arrested four accused from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.