तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या बाईक चोरांच्या टोळीतील दोघे पकडले; १३ गाड्या जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: August 13, 2022 05:38 PM2022-08-13T17:38:10+5:302022-08-13T17:39:40+5:30
तीन जिल्ह्यातून चोरी केलेल्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत
लातूर : शहरातील गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी, उस्मानाबाद आणि साेलापूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बाईक चोरांच्या टोळीतील दोघांच्या लातूर पाेलिसांनी शनिवारी मुसक्या आवाळल्या. दरम्यान, त्यांच्याकडून चाेरण्यात आलेल्या १३ माेटारसायकली असा एकूण ६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील वाढत्या माेटारसायकल चाेरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कारवाईचे आदेश दिले हाेते. त्यानुसार विशेष पथकाने चाेरट्यांचा माग काढत माहिती मिळवली. गस्तीवर असलेल्या पथकाने दाेघा संशयीतला फिरताना आढळून आले. त्यांचा पाठलाग करुन नवीन गुळ मार्केटनजीक त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चाैकशी केली असता, उडवा-उडवीची उत्तरे दिली. ताब्यात असलेल्या माेटारसायकलची (एम.एच. २४ बी.एन. ०३५८) अधिक माहिती घेतली असता, ती चाेरीची असल्याचे समाेर आले.
याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला हाेता. शुभम उर्फ सुग्रीव जरीचंद कुर्भकर्ण (वय २८ रा. घारगाव ता. कळंब जि. उस्मानाबाद) आणि गाेपाळ सखाराम माने (वय २९, रुई धारुर जि. बीड) अशी त्यांनी नावे सांगितली. अधिक झाडाझडती घेत चाैकशी केली असता, चाेरीतील १२ माेटारसायकली पाेलिसांच्या हाती लागल्या. या माेटारसायकली लातूर, उस्मानाबाद येथील आनंद नगर आणि साेलापूर शहरातील फाैजदार चावडी हद्दीतून चाेरण्यात आल्याचे समाेर आले आहे.
ही कारवाई अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे, सपाेनि. प्रशांत लाेंढे, पाेहेकाॅ. दामाेदर मुळे, उमाकांत पवार, युसूफ शेख, दत्तात्रय शिंदे, मुकेश सूर्यवंशी, रणवीर देशमुख, शिवाजी पाटील, र णजित शिंदे, अस्लम सय्यद, रामचंद्र ढगे, महेश पारडे, अभिमन्यू साेनटक्के, भाउसाहेब मंतलवाड, पाेलीस नाईक पाटील यांच्या पथकाने केली.