रेल्वेच्या धडकेत दाेघेजणांची मृत्यू, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न
By राजकुमार जोंधळे | Published: August 7, 2022 07:34 PM2022-08-07T19:34:03+5:302022-08-07T19:35:04+5:30
Accident Case : पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत लातूर रेल्वेस्थानक येथून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने रायवाडी शिवारात एका तरुणाला जाेराची धडक दिली.
लातूर : मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने दिलेल्या धडकेत दाेघे जण ठार झाल्याची घटना लातूर शहर आणि रायवाडीनजीक शनिवारी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दाेन्ही घटना दाेन तासाच्या फरकाने घडल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात रविवारी आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत लातूर रेल्वेस्थानक येथून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने रायवाडी शिवारात एका तरुणाला जाेराची धडक दिली. यामध्ये २५ वर्षीय तरुण ठार झला आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, ठार झालेल्या तरुणाच्या खिशात एक आधार कार्ड आढळून आले आहे. त्यावर महादेव मनाेहर काेंपले (वय २५ रा. आळंदी जि. पुणे) असे नमुद करण्यात आले आहे. मयत तरुणाची ओळख पटविण्यासाठी एमआयडीसी पाेलिसांनी रविवारी दिवसभर प्रयत्न केले. पुणे पाेलिसांशी संपर्क साधला मात्र सायंकाळपर्यंत त्याची ओळख पटली नाही.
तर दुसऱ्या घटनेत नवीन रेणापूर नाका येथील उड्डाणपुलाखाली लातूर राेडकडून लातूर रेल्वेस्थानकाच्या दिशेने निघालेल्या रेल्वेने धडक दिल्याने एक जण ठार झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या मृताची ओळख पटली असून, मुबारक फारुख शेख (वय ३८, रा. आरजखेडा ता. रेणापूर) असे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. घटनास्थळी पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पाेलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लाेखंडे, पाेहेकाॅ. गाेविंद बिराजदार यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत लातूर येथील शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस करत आहेत.