हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक

By राजकुमार जोंधळे | Published: March 25, 2024 06:48 PM2024-03-25T18:48:01+5:302024-03-25T18:49:05+5:30

पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसाय, शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.

Two people were arrested in Ausa for walking around with knives in their hands | हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक

हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक

लातूर : हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी सोमवारी अटक केली असून, औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून कत्ती आणि काठी जप्त केली आहे.

पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसाय, शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अपर  पोलिस अधीक्षक  डॉ. अजय देवरे, औसा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्याची माहिती काढत होते. दरम्यान, खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे औसा शहरातील याकतपूर मोड परिसरात दोघा तरुणांना हातात धारदार कत्ती आणि काठी घेऊन दहशत निर्माण करत फिरताना सोमवारी अटक करण्यात आली. 

रसूल खय्युम शेख (वय २८, रा. कव्वा नाका, लातूर) आणि लखन कैलास रणदिवे ( वय ३२, रा. माताजी नगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलिस अंमलदार वाडकर, डीगे, हिंगणे, होगाडे, पाटील यांच्या पथकाने केली आहे. याबाबत औसा पोलिस ठाण्यात कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अन्यबोईनवाड हे करीत आहेत.

Web Title: Two people were arrested in Ausa for walking around with knives in their hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.