‘नीट’प्रकरणी लातूर जिल्ह्यातून दाेघा संशयितांना घेतले ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Published: June 22, 2024 08:44 PM2024-06-22T20:44:29+5:302024-06-22T20:44:46+5:30

महाराष्ट्र‘एटीएस’च्या पथकाने केली कारवाई

Two suspects were taken into custody from Latur district in the NEET case | ‘नीट’प्रकरणी लातूर जिल्ह्यातून दाेघा संशयितांना घेतले ताब्यात

‘नीट’प्रकरणी लातूर जिल्ह्यातून दाेघा संशयितांना घेतले ताब्यात

राजकुमार जाेंधळे / लातूर : एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्या वतीने घेण्यात आलेल्या नीटच्या निकालानंतर झालेल्या गाेंधळात देशभर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, शनिवारी याच प्रकर णाशी संबंधित असल्याच्या संशयावरुन दाेघांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट दिलेली आहे. निकालानंतर ग्रेस गुण आणि काही राज्यामध्ये झालेल्या पेपरफुटीच्या चर्चेनंतर नीटमध्ये गडबड झाल्याचा संशय वाढला. परराज्यात जाऊन परीक्षा देणे, वाढलेला निकाल या संदर्भाने चर्चा सुरु असून, गुजरात, पंजाब, हरियाणा व बिहार राज्यात पेपरफुटीच्या तक्रारी झाल्या. गुन्हेही दाखल हाेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातही ‘एटीएस’च्या पथकाने तपास सुरु केला आहे. लातूरमधून दाेघांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे. चाैकशी सुरु झाली आहे. त्यामुळे अधिकचा तपशील समाेर आलेला नाही. घडल्याप्रकाराशी त्या दाेघांचा संबंध आहे अथवा नाही याचा खुलासाही तपासाअंती हाेईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Two suspects were taken into custody from Latur district in the NEET case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.