लातुरात दुचाकी-कंटेनरचा अपघात; धाराशिव जिल्ह्यातील पती-पत्नीचा मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Published: April 19, 2024 11:22 PM2024-04-19T23:22:15+5:302024-04-19T23:22:48+5:30
याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
लातूर : शहरातील विवेकानंद चाैकाकडून रिंगराेड मार्गाने गावाकडे दुचाकीवरून निघालेले पती-पत्नी कंटेनरच्या अपघातात ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास बाभळगाव नाका येथे घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
पाेलिसांनी सांगितले, धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा येथील रहिवासी मंगेश भानुदास कांबळे (वय ३०) आणि प्रगती मंगेश कांबळे (२४) हे लातुरातील विवेकानंद चाैकातून बाभळगाव नाका परिसरातून रिंगराेडने गावाकडे दुचाकीवरून (एम.एच. १३ ई.ई. १७१२) शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास निघाले हाेते. दरम्यान, बाभळगाव नाका परिसरात कंटेनरच्या (एन.एल. ०१ ए.एफ. ९१२०) अपघातात ते गंभीर जखमी झाले. यामध्ये मंगेश कांबळे हे जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या प्रगती कांबळे यांना शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले हाेते. मात्र, तेथील डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत झाल्याचे घाेषित केले. घटनास्थळी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींना तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघात स्थळावरून कंटेनर, दुचाकी ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती, असे पाेलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले.
कंटेनरच्या टायरखाली दुचाकी... -
बाभळगाव नाका परिसरात कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली दुचाकी चिरडल्याचे समाेर आहे. या अपघातात दाेघेही पती-पत्नी ठार झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. यात नेमकी काेणाची चूक आहे, याची चाैकशी पाेलिस करीत आहेत. दाेघेही लातुरातून धाराशिवकडे निघाले हाेते. दरम्यान, हा अपघात झाला, असेही पाेलिसांनी सांगितले.