दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार तर दाेघे गंभीर
By राजकुमार जोंधळे | Published: November 30, 2024 11:06 PM2024-11-30T23:06:43+5:302024-11-30T23:07:08+5:30
लातूर-नांदेड महामार्गावरील चापोलीची घटना
राजकुमार जाेंधळे / लातूर : दाेन दुचाकीची समाेरासमाेर जाेराची धडक लागल्याची घटना शनिवारी चापाेली (ता. चाकूर) येथे लातूर-नांदेड महामार्गावर घडली. यामध्ये चापोली येथील तरुण जागीच ठार झाला तर इतर दाेघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
चापोली येथील व्यंकट शेषराव तेलंगे (वय ४२) आणि मित्र माधव बापूराव पांचाळ (वय ५२) हे दोघे शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिरूर ताजबंदकडून चापोलीकडे दुचाकीवरुन (एम.एच. ३१ डी.टी. १२७१) प्रवास करत हाेते. तर मोहन बाबुराव किनीकर (वय ५८ रा. कव्हा ता. लातूर) हे नातवाला पाहण्यासाठी चापोली येथून मुळकी उमरग्याकडे दुचाकीवरुन (एम.एच. २४ के २७८७) जात होते. दरम्यान, चापोलीनजीक लातूर-नांदेड महामार्गांर शेटकर यांच्या शेताजवळ आले असता, दोन दुचाकींची समोरासमोर जाेराची धडक झाली. यामध्ये व्यंकट तेलंगे हे जागीच ठार झाले. त्याच्यासाेबत असलेले माधव बापूराव पांचाळ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोहन किनीकर यांनाही एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात नोंद केली आहे.
मयत व्यंकट तेलंगे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार हाेणार आहेत.