मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले

By हरी मोकाशे | Published: October 22, 2022 10:30 AM2022-10-22T10:30:38+5:302022-10-22T10:31:31+5:30

दाेन तरुण महाराष्ट्राकडुन कर्नाटकात जाताना अडकले असून त्यांना चाैहुबाजूने पाण्याने घेरले आहे.

two youths got caught in the flood at manjara terna confluence | मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले

मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले

googlenewsNext

लातूर : गेले दोन दिवस झाले, मांजरा तेरणा या नद्यांना परतीच्या पावसाच्या पावसाने पुरआलेला आसुन यात मांजरा व तेरणा प्रकल्पाचे पाणी साेडल्याने औराद शहाजानी (ता. निलंगा) दाेन्ही नद्यांच्या संगमावर पूरस्थिती निर्माण झाली असुन यात दाेन तरुण महाराष्ट्रा ॉकडुन कर्नाटक राज्यातील वांजरखेडा जाताना अडकले असून त्यांना चाैहुबाजूने पाण्याने घेरा घातली आहे.

औराद शहाजानी परिसरामध्ये गेली दोन दिवस सतत झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने अगोदर त्यांना मांजरा नद्या पूर्ण प्रवाह भरून वाहत असून यातच गेली दोन दिवस झाले माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प व मांजरा प्रकल्प या दोन्ही मोठ्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त  पाण्याचा विसर्ग 
नदीपात्रात सोडण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक दोन्ही नद्या वरील बॅरिजेसची दारे पूर्ण क्षमतेने उघडी करण्यात आले असून एकंदरीत सर्व पाण्याचा वाढता प्रवाह नदीपत्राबाहेर अनेक किलोमीटर शेती शिवारात पसरला असून महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्याला जोडणारे या दोन्ही नद्या वरील सर्व पूल पाण्याखाली गेले असून नदीपलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. 

यातच शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्रातील औराद शहाजानी येथून कर्नाटकात नदीपलीकडील वांजरखेडा गावाकडे जाण्यासाठी दोन तरुण ट्रॅक्टर मध्ये बसून निघाले असता त्यांना  औराद ग्रामपंचायत सदस्य तथा स्थानिक शेतकरी सह अनेकांनी पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला तरी पण ते तरुण ट्रॅक्टर घेऊन फुलाकडे जाण्याचा प्रयत्न केला यात ते मध्यभागी उंच ठिकाणी अडकलेले असून त्यांना चाैहु बाजूने मांजरा व तेरणा दोन्ही संगम नद्यांचा पाण्याचा पुराचा वेढा पडलेला आहे. दरम्यान त्यांना यापुरातून बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टिम व रेस्क्यू टीम लवकरच घटनास्थळी दाखल होणार असल्याचे तहसिलदार अडसुळ म्हणाले. 

घटना स्थळावर औराद शहाजानी पाेलिस ठाण्याचे संदीप कामत व पाेलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त लावलेला आहे दरम्यान मांजरा नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तेरणा नदीचे पाञाचे पाणी बँक वाँटर पसरले असल्याचे जलसिंचन विभागाचे अभियंता एस आर मुळे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: two youths got caught in the flood at manjara terna confluence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर