‘उदयगिरी’च्या कर्मचाऱ्याला मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: April 5, 2025 21:26 IST2025-04-05T21:26:19+5:302025-04-05T21:26:54+5:30

उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि. कदम हे करीत आहेत.

'Udayagiri' employee beaten up; Crime against 5 people | ‘उदयगिरी’च्या कर्मचाऱ्याला मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

‘उदयगिरी’च्या कर्मचाऱ्याला मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

राजकुमार जाेंधळे 

उदगीर (जि. लातूर) : शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याला शनिवारी दुपारी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास फैसल अमजद हाश्मी, शहेबाज अमजद हाश्मी, आयान मजहर देशमुख, सलमान खलील शेख आणि फैजान उस्ताद (सर्व रा. उदगीर) हे महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत तरीही बेकायदेशीरपणे महाविद्यालयात कार घेऊन आले हाेते. कार भरधावपणे त्यांनी प्राचार्यांच्या केबीनभोवती चालवीत असताना कर्मचारी विकास विलासराव वट्टमवार यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी फैसल अमजद हाश्मी याने फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने फायटरने डोक्यात, जबड्यावर, ओठावर मारून गंभीर जखमी केले. तर शहेबाज अमजद हाश्मी याने त्याच्या हातातील काठीने डोक्यामध्ये मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर इतरांनी शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली. असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि. कदम हे करीत आहेत.

Web Title: 'Udayagiri' employee beaten up; Crime against 5 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.