अटल अमृतमधून वर्षअखेरपर्यंत मिळणार उदगीर शहराला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:54+5:302021-01-08T05:01:54+5:30

उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अटल अमृत योजना कार्यान्वित झाली. या योजनेचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. ही योजना ...

Udgir city will get water from Atal Amrit till the end of the year | अटल अमृतमधून वर्षअखेरपर्यंत मिळणार उदगीर शहराला पाणी

अटल अमृतमधून वर्षअखेरपर्यंत मिळणार उदगीर शहराला पाणी

Next

उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अटल अमृत योजना कार्यान्वित झाली. या योजनेचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. ही योजना प्रारंभापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यातून मार्ग काढत या अटल अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

उदगीर शहराला अटल अमृत योजनेतून लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्व कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. शहरातील विविध भागांत या योजनेच्या जलवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, दुरुस्ती रखडलेली होती. अखेर रविवारपासून सदरील रस्ते दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामाचा प्रारंभ नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले, अनिल मुदाळे, शमशोद्दीन जरगर, पप्पू गायकवाड, दत्ता पाटील, श्रीरंग कांबळे, महेबूब शेख, लखन कांबळे, अभियंता सुनील खटके, जीवन प्राधिकरण उपअभियंता नागरगोजे, तेजस कुलकर्णी, विजय भोपले, गणेश पाटील आदींची उपस्थिती होती.

नागरिकांचे लागले लक्ष...

गेल्या दोन वर्षांपासून अटल अमृत योजनेतून पाणीपुरवठ्याचे काम सुरू आहे. सुरुवातीपासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, आता या योजनेचे काम पूर्णत्वाकडे येत असल्याने नागरिकांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Udgir city will get water from Atal Amrit till the end of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.