पैशांची बॅग समजून उत्तरपत्रिका पळवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:41 AM2019-03-15T03:41:47+5:302019-03-15T03:42:03+5:30
प्राध्यापकाच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पैशांची बॅग समजून बारावीच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठाच लंपास केला.
पैशांची बॅग समजून उत्तरपत्रिका पळविल्यानिलंगा (जि़ लातूर) : प्राध्यापकाच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पैशांची बॅग समजून बारावीच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठाच लंपास केला. बुधवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी प्राचार्य केळगावकर यांच्या फिर्यादीवरुन निलंगा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापकांकडे बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या होत्या. मराठी विषयाचे प्रा. नेताजी भानुदास काळे व रसायनशास्त्र विषयाचे प्रा. दत्ता शेषराव कुलकर्णी हे न तपासलेल्या काही उत्तरपत्रिकांचे गठ्ठे मॉडरेटरकडे जमा करण्यासाठी सहकारी प्रा़ सूर्यकांत माळी यांच्या कारमध्ये बसून आले होते. सर्वजण बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले. याच कालावधीत चोरट्यांनी गाडीची काच फोडून आतील कापडी पिशव्याचे गठ्ठे पळविले.