कायद्याच्या वापरापेक्षा समजूतदारपणा महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:20 AM2021-09-25T04:20:03+5:302021-09-25T04:20:03+5:30
येथील शमशिया मस्जिद येथे आयोजित जनजागृती अभियानात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी दिवाणी न्या. पी. ए. सवदीकर, दिवाणी न्या. ...
येथील शमशिया मस्जिद येथे आयोजित जनजागृती अभियानात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी दिवाणी न्या. पी. ए. सवदीकर, दिवाणी न्या. ए. जी. साबळे, दिवाणी न्या. एस. एस. तोंडचिरे, न्या. ए. ए. उत्पात, ॲड. एच. आर. पाटील, ॲड. टी. एन. कांबळे, ॲड. जुनेद जहागीरदार, मस्जिद कमिटीचे अध्यक्ष साजीदभाई सय्यद, मौलाना सय्यद युसूफ इशाअती, मोहसीन बायजीत, हाफेज खुर्शीद, मोहिब कादरी, हाफेज इरशाद साहब, हाफेज अब्दुल रौफ साहब, हाफेज मजहर साहब, हाफेज अहमद साहब, अजहर बागवान आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा न्या. ठाकरे म्हणाले, आई-वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांच्यात वयोमानाने अनेक बदल होतात. परंतु, त्यांचा सांभाळ करणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे. अनेकदा मालमत्तेवरून आपापसात तंटे होतात आणि प्रकरण न्यायालयात दाखल होते. परंतु, कायद्याने लढण्यापेक्षा समजुतीने पर्याय काढणे महत्त्वाचे आहे. न्यायालयाच्या माध्यमातून चालू असलेले तंटे सोडविण्यासाठी लोकअदालत घेतली जाते. या लोकअदालतीत आपली प्रकरणे, वाद-विवाद तत्काळ मिटवता येतात. नागरिकांनी लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा आणि आपले प्रश्न सोडवावेत, असेही ते म्हणाले.
यावेळी मौलाना युसूफ यांनी कुराणमधील सहा आयतांची माहिती दिली. त्यात पालकांचा सांभाळ करणे ही इस्लामची शिकवण असल्याचे म्हणाले. यावेळी साजीदभाई सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ॲड. ईनायतअली देशमुख यांनी केले. आभार साजीदभाई सय्यद यांनी मानले.