अनुयायांकडून अनोखे अभिवादन; साडेचार हजार दीपांनी साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती !

By राजकुमार जोंधळे | Published: December 6, 2022 06:59 PM2022-12-06T18:59:39+5:302022-12-06T19:00:06+5:30

दीपांनी उजळलेली ही प्रतिमा डोळ्यांत साठवून हजारो आंबेडकरप्रेमी जनतेने बाबासाहेबांना अभिवादन केले.

unique greetings from followers; A replica of Dr. Babasaheb Ambedkar was drawn by four and a half thousand lamps! | अनुयायांकडून अनोखे अभिवादन; साडेचार हजार दीपांनी साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती !

अनुयायांकडून अनोखे अभिवादन; साडेचार हजार दीपांनी साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती !

Next

लातूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साडेचार हजार दीपांनी प्रतिमा साकारण्यात आली. दीपांनी उजळलेली ही प्रतिमा डोळ्यांत साठवून हजारो आंबेडकरप्रेमी जनतेने बाबासाहेबांना अभिवादन केले.

छायाचित्रकार बालाजी धायगुडे यांनी भन्ते पय्यानंद यांच्या मार्गदर्शनाखाली १५ बाय ४० फूट आकारावर साडेचार हजार दीप लावून बाबासाहेबांची प्रतिकृती तयार केली. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू होते. पावणेबारा वाजता काम पूर्ण झाले. यावेळी हजारो आंबेडकरप्रेमी नागरिकांनी पार्कवर येऊन दीपांनी साकारलेली प्रतिमा डोळ्यांत साठवली.
 

Web Title: unique greetings from followers; A replica of Dr. Babasaheb Ambedkar was drawn by four and a half thousand lamps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.