निलंग्यात अनोखे आंदोलन; मराठा आंदोलकांचे रक्तदान, पोलिसांना राखी बांधून रक्षणासाठी साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 05:04 PM2023-09-05T17:04:01+5:302023-09-05T17:05:12+5:30
जालना लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ निलंग्यात अनोखे आंदोलन
निलंगा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे, यावेळी आंदोलकांनी रक्तदान केले, तसेच पोलिसांना राखी बांधत अनोखे आंदोलन केले.
सकाळपासूनच निलंगा शहर व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला. लाठीहल्ल्यात मराठा बांधवांचे रक्त सांडले म्हणून आंदोलकांनी यावेळी रक्तदान केले. तसेच निलंगा पोलीस उपाधीक्षक नितीन कटेकर पोलीस निरीक्षक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक राठोड आदी पोलीस कर्मचाऱ्यांना नंदिनी गोविंद इंगळे या मुलीने राखी बांधत मराठा माता भगिनी, बांधवांचे रक्षण करावे असे साकडे घातले.
आंदोलनात अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. अरविंद भातंबरे,अभय सोळुंके,दास साळुंके, अविनाश रेशमे, ईश्वर पाटील, लालासाहेब देशमुख, लाला पटेल, संजय इंगळे, प्रमोद कदम, हरिभाऊ सगरे, चक्रधर शेळके, अजित माने, बबन राजे, तुळशीदास साळुंके, तिरुपती शिंदे ,डॉ. एस एस शिंदे, सुरेंद्र धुमाळ, किरण पाटील, दत्ता बसपुरे, संदीप कांबळे, राजाभाऊ साळुंखे, विशाल जोडदापके, प्रकाश गोमसाळे, कृणाल पाटील, पवार सूर्यवंशी,तुराब बागवान, गोविंद शिंगाडे, विलास सूर्यवंशी परमेश्वर जाधव आदींचा सहभाग होता.