लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध

By संदीप शिंदे | Published: September 29, 2022 06:56 PM2022-09-29T18:56:01+5:302022-09-29T18:57:12+5:30

आठवडाभरात रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास महापालिकसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

Unique movement of MNS in Latur; The municipal corporation protested by planting trees in the pits of the road | लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध

लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध

Next

लातूर : शहरातील विविध रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मिनी मार्केट रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले. आठवडाभरात रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास महापालिकसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

आंदोलनात शहराध्यक्ष मनोज अभंगे, बजरंग ठाकुर, जहांगीर शेख, अनिल जाधव, परमेश्वर पवार, दत्ता म्हेत्रे, बालाजी पाटील, नाना धुमाळ, सिध्दु इरले, सचिन पांचाळ, गोविंद उदगीरे, अमोल हांडे, रवी मगर, तुकाराम कांबळे, अदिनाथ कारले, ओम शिंदे आदींसह पदाधिकारी सहभागी होते.

रस्त्याची दुरस्ती न केल्यास मनपासमोर आंदोलन...
लातूर शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे मनपा आणि संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. पुढील आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्यावतीने मनपासमोर आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष मनोज अभंगे यांनी दिला.

Web Title: Unique movement of MNS in Latur; The municipal corporation protested by planting trees in the pits of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.