उद्याेगभवन परिसरात विनाकारण फिरणे अंगलट; कारवाईचा बडगा

By राजकुमार जोंधळे | Published: February 28, 2023 09:29 PM2023-02-28T21:29:24+5:302023-02-28T21:31:00+5:30

एकाच दिवसात १४९ खटले : एक लाख १४ हजारांचा दंड

unreasonable loitering in udyog bhavan premises police take action | उद्याेगभवन परिसरात विनाकारण फिरणे अंगलट; कारवाईचा बडगा

उद्याेगभवन परिसरात विनाकारण फिरणे अंगलट; कारवाईचा बडगा

googlenewsNext

लातूर : शहरातील उद्याेगभवन परिसरात विनाकारण फिरणाऱ्या तरुणांवर शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकाच दिवसात तब्बल १४९ वाहनधारक तरुणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांना एकूण एक लाख १४ हजार ४०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या विशेष पथकाकडून ही कारवाई केली आहेत. साेमवार- मंगळवार असे दाेन दिवस केलेल्या कारवाईत १४९ माेटरसायकल चालक, तरुण दाेषी आढळले आहेत. शिवाय, विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना पाेलिसांनी चांगलीच समज दिली आहे. शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या वतीने साेमवार, मंगळवारी काेंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले असून, यासाठी काेचिंग क्लासेस परिसरात तीन पाेलिस अधिकारी, १३ पाेलिस अमलदार, १० आरसीपी प्लाटूनचे जवान, २० हाेमगार्डच्या पथकाने पुढाकार घेतला. यावेळी सिगारेट, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थविराेधी कायदा व नियम - २००३ ‘काेपता’अंतर्गत १० खटले दाखल केले असून, नऊ हजार रुपयांचा दंड केला आहे. माेटार वाहन कायद्यानुसार ८६ जणांवर खटले दाखल केले असून, त्यांना ७४ हजार ९०० रुपयांचा दंड केला. तर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने माेटार वाहन कायद्यानुसार ५३ जणांविराेधात खटले दाखल करण्यात आले असून, त्यांना ३० हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. एकाच दिवसात एक लाख १४ हजार ४०० रुपयांचा दंड केला आहे.

रहदारीला अडथळा; १९ जणांवर खटले...

उद्याेगभवन परिसरात लावण्यात आलेल्या विविध फलकांमुळे रहदारीला अडथळा निर्माण हाेत आहे. याप्रकरणी रहदारीला अडथळा करणाऱ्या फलकधारकांवर शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी महाराष्ट्र पाेलिस कायदा कलम १०२, ११७ अन्वये १९ जणांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: unreasonable loitering in udyog bhavan premises police take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.