सुनेगाव शेंद्रीतील फ्लोराइडयुक्त पाण्याचा वापर सांडपाण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:41+5:302021-04-26T04:17:41+5:30
तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बोअर घेण्यात आला होता; परंतु सदरील बोअरमधून फ्लोराइडयुक्त पाणी येत ...
तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बोअर घेण्यात आला होता; परंतु सदरील बोअरमधून फ्लोराइडयुक्त पाणी येत असल्याने जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून गावात फिल्टर बसविले; परंतु काही दिवसांतच ते बंद पडले. त्यामुळे हे फिल्टर सध्या धूळखात पडून आहे. परिणामी, गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच पाण्याचा बोअरही बंद पडला. त्यामुळे गावातील नागरिकांना सांडपाण्यासाठीही फिरावे लागत होते.
नूतन सरपंच उषा जायभाये यांनी गावातील अडचणी जाणून घेतल्या. सरपंचांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करून बोअरमधील मोटार काढून घेतली. सोलारवर चालणारा पंप सुरू करून तात्पुरता गावातील नागरिकांसाठीचा सांडपाण्याचा प्रश्न सोडविला. सदरील फिल्टर सुरू करण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे राम जायभाये यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू होळकर, गोपीनाथ जायभाये, गोविंद काळे, सोपान जायभाये, हणमंत थगनर, नरहरी थगनर, भरत काटे, ज्ञानदेव होळकर, गंगाधर थगनर, बाबू काटे, सुनील काटे, शिवानंद काटे, योगानंद काटे, शंकर काटे, शिवराज थगनर, नारायण काटे, प्रल्हाद काटे, दयानंद काटे, दीपक होळकर, निवृत्ती होळकर, मनोहर होळकर, जनार्दन होळकर, सोनू थगनर आदींची उपस्थिती होती.